भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या राज्यमार्ग वरील पालगाव बस स्टॉप समोर आज दि. 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वा. दरम्यान आसाराम लक्ष्मण शेंद्रे वय 34 रा. पालगाव हे मोटरसायकल क्र. MH 36 Q 0580 ने पवनी कडून स्वताच्या गावी येत असता पालगाव बस स्टॉप समोर त्याचा मोटर सायकल वरील नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल स्लिप होऊन रस्त्याच्या कडेला रोडवर आढळली. त्यात आसाराम यांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली.