शिव छत्रपती गणेश मंडळाच्या वतीने १० सप्टेंबर रोज मंगळवारी सकाळी १० वाजता नारी शक्ती सन्मान महिला भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन राज्याचे कॅबिनेट मंत्री ,तथा उदगीर मतदार संघाचे आमदार व परभणी जिल्याचे पालकमंत्री नामदार संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले,ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चौबारा व परत छत्रपती शिवाजी महाराज पर्यंत काढण्यात आली या रॅलीत मंत्री संजय बनसोडेनी स्वतः सायकल चालवत आपला सहभाग नोंदवला.