वाडेगाव येथे गेल्या काही दिवसांपासून लाल तोंडाच्या माकडाने हैदोस घातला होता. गावात शिरून नागरिकांच्या घरावर उड्या मारणे त्यामुळे जुन्या कौलाची तसेच घरात अंगणात घुसून सामानाची नासधूस करणे,बऱ्याच जणांना त्या लाल तोंडाच्या माकडाने चावा देखील घेतला होता.अखेर बुधवार दि.३० जुलै रोजी वाडेगाव येथील बस स्थानकाजवळ वन विभागाला माकडाला जेरबंद करण्यात यश आले.मात्र वन विभागाला माकडाने ४ तास सतावले.त्यानंतर शूटर तायडे यांनी इंजेक्शन मारून बेहोश करून सदर माकडाला पिंजऱ्यात टाकले व जंगलात नेवून सोडले.