वागळे स्टेट परिसरामध्ये काल रात्रीच्या सुमारास एक भीषण घटना घडली आहे.काल रात्री आठ ते दहा वाजण्याच्या दरम्यान वागळे इस्टेट परिसरातील रोड क्रमांक 27 येथील आयटी सर्कल जवळ एका शिंदे गटाच्या कार्यकर्त्याची कारने चिरडून जागीच हत्या केल्याची घटना घडली आहे. कारने पाठीमागे पुढे तीन ते चार वेळा घेऊन त्याला चिरडले आणि तेथून पसार झाला. संतोष पवार असे आरोपीचे नाव असल्याची माहिती मिळत आहे. गाडीने तीन ते चार वेळा त्या व्यक्तीला चिरडल्यामुळे परिसरामध्ये रक्त मोठ्या प्रमाणा पसरले होते.