मुंब्रा परिसराच्या दौलत नगर येथे लकी कंपाउंड इमारतीचा काही भाग रस्त्याने जात असलेल्या दोन महिलांच्या अंगावर पडल्याची घटना घडली. माहिती मिळतात सर्व टीम घटनास्थळी दाखल झाल्याआणि महिलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र नाहीद (62) महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर इमला नावाची महिला गंभीर जखमी असल्याने उपचार सुरू करण्यात आले. तसेच इमारत धोकादायक असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून इमारत खाली करून इमारत सील करण्यात आली आहे. रहिवाशांच्या इतरत्र स्थलांतर केले आहे.