मच्छीमार बांधव, सागर सुरक्षा दल व पोलिस यांच्या मध्ये समन्वय वृध्दीगत करण्यासाठी रायगड जिल्हा पोलिस अंतर्गत सागरी सुरक्षा चषक 2025 च्या साखळी कब्बडी स्पर्धेचा भव्य शुभारंभ शनिवारी सकाळी अकरा वाजता रेवदंडा बीच येथे संपन्न झाला. सागरी सुरक्षा व मच्छीमार बांधव यांचेसाठी आयोजीत दि. 13 सप्टेबर 2025 ते 17 सप्टेबर 2025 कालावधीत रायगड जिल्हा पोलिस अंतर्गत सागरी सुरक्षा चषक 2025 च्या साखळी कब्बडी स्पर्धा मांडवा, अलिबाग, रेवदंडा, मुरूड व श्रीवर्धन या समुद्र किनारी आयोजन केले आहे.