शनिवारी सायंकाळी शिये फाटा येथील फेडरल बँकेसमोर वैयक्तिक वादातून पिस्तुलातून हवेत गोळ्या झाडण्याची घटना घडली.याप्रकरणी आरोपी गणेश अर्जुन शेलार याला शिरोली पोलिसांनी अटक करून आज रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता वडगाव न्यायालयात हजर केले असता त्यास मंगळवारपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.गणेश शेलार, विजय पोवार व अन्य काही जण टोप गावातील बारमध्ये दारू पित होते.