पंढरपूर तालुक्यातील भाळवणी शिवार येथे शेतकऱ्याची पाणबुडी मोटर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी दिपक रावसाहेब गवळी (वय 42, रा. भाळवणी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची शेतजमीन गट नं. 235/2 मधून निरा उजवा कालवा शाखा नं.2, कॅनॉल फाटा नं.18 जातो. याठिकाणी दि. 20 जुलै रोजी त्यांनी 7.5 H.P. KALCO कंपनीची निळ्या रंगाची स्टील बॉडी असलेली पाणबुडी मोटर बसवली होती. दि. 26 जुलै रोजी रात्री 10 वाजता त्यांनी शेताला पाणी देण्यासाठी मोटर सुरू केली व 11 वाजता घरी गेले.