धुळे शहरातील वाहतूक पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की करून काही तासांतच पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्वागत कक्षाची तोडफोड करणाऱ्या सडगाव येथील एका तरुणावर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोपान पाटील असे या संशयिताचे नाव असून, त्याने विनाकारण हा गोंधळ घातल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी घडली.