डॉक्टर किशोर घाटे यांच्यावर प्राण घातक हल्ला करणाऱ्या आरोपी विरोधात कडक कारवाई करा असे निवेदन जळगाव जामोद मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे. डॉक्टर किशोर घाटे हे वडोदा येथून जळगाव कडे येत असताना रात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर प्राण घातक हल्ला केला. या घटनेचा डॉक्टर संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला.