बचेरी (ता. माळशिरस) येथील शेतकरी दीपक श्रीमंत गोरड यांच्या गट नंबर 246 या दीड एकर क्षेत्रामध्ये शेतीला दिवसा पाणी देता यावे. म्हणून विहिरीवर बसवलेला सोलरपंपच्या प्लेटा अज्ञात चोरट्याने काढून नेल्या आहेत. यामुळे 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात माळशिरस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती माळशिरस पोलिसांनी आज मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता दिली आहे.