पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दाऊदी बोहरा समाजाकडून सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये भाविक व नागरिकांसाठी मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. गणेश मंडपांमध्ये मोठ्या संख्येने भाविक गर्दी करत असल्याने आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने हा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी साधारण आजारांवर उपयुक्त ठरणारी औषधे, प्राथमिक उपचार साहित्य नागरिकांना देण्यात आले.