कोकणातील गणणेशोत्सावाला अनन्य साधारण महत्व आहे. या मांगल्याच्या उत्सवाला आज हरतालिका पूजन करत सुरुवात होणार आहे. तर उद्या २७ ऑगस्टला विघ्नहर्ता श्री गणेशाचे आगमन होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ सार्वजनिक गणपती य ७२ हजार ७५५ घरगुती गणेश मुर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून आज मंगळवार 26 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता देण्यात आली.