पाथर्डी फाटा,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवळ हद्दपार गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक करून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.किशोर बबन आव्हाड राहणार पाथर्डी फाटा याला परिमंडळ दोन उपायुक्त यांच्या आदेशाने नाशिक शहर व ग्रामीण भागातून हद्दपार केलेल्या असतानाही कुठलीही परवानगी न घेता पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ फिरताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक करून कारवाई केली आहे.