मेळघाटातील मातामृत्यू रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी आजही मेळघाटातील गर्भवती महिलांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे दिसून येत आहे.त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. चिखलदरा तालुक्यातील शहापूर गावातील लक्ष्मी कैलास हेकडे या गर्भवती महिलेचा बुधवार २७ रोजी सिकलसेल मुळे मृत्यू झाला.या मृत्यूने पुन्हा एकदा आरोग्य विभागातील रिक्त पदांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.