हिंगणी गावंडगाव येथे आज दुपारी १२ वाजता ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने गावालगत असणाऱ्या नदीला मोठा पूर आला आहे. पुराचे पाणी हे नागरिकांच्या घरात शिरलय, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड नुकसान झालय तसेच शेती पिकं सुद्धा पाण्याखाली गेली आहेत, तुर कपाशी, सोयाबीन या पिकांना मोठा फटका बसला आहे. नुकसान ग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याची मागणी आता हिंगणी गावंडगाव येथील शेतकरी व ग्रामस्थ करीत आहे. गेल्या चार दिवसांपासून दर्यापूर अंजनगाव तालुक्यासह जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे.