तेल्हारा शहरात मोकाट जनावरांच्या समस्येने गंभीर वळण घेतले असून, रहदारी व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. युवासेनेने तीन दिवसांचा इशारा दिल्यानंतर अवघ्या तीन तासातच नगर परिषद प्रशासनाने जनावरे पकडण्याची कारवाई सुरू केली. शहरात लाऊडस्पीकरद्वारे जनतेला सूचना देण्यात आली असून, जनावरांचा बंदोबस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता प्रशासन खरोखरच कठोर कारवाई करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, जनहितासाठी ही कृती गरजेची होती.