ओबीसी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक न्यायासाठी आवश्यक धोरणं तयार करणे, त्यांच्या आरक्षणाच्या अधिकारांवर कुठलाही आघात होऊ नये. याकरिता राष्ट्रीय ओबीसी महासंघ व विविध ओबीसी संघटनेच्या माध्यमातून ओबीसीच्या न्याय हक्कासाठी नागपूर येथे साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून या साखळी उपोषणात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे हे सुद्धा सहभागी झाले.