जत शहरात वर्गणीच्या नावावर व्यापाऱ्यांना धमकावून आणि मारहाण करून हप्ते वसूल करणाऱ्या खंडणीखोरांचा पोलिसांनी त्वरित बंदोबस्त करावा या मागणीसाठी, जत व्यापारी असोसिएशनच्या वतीने व्यवसाय बंद ठेवून, जत शहरातून निषेध फेरी काढली. आणि जतचे तहसीलदारांना निवेदन दिले. जत तेथील व्यवसायिकांकडून विविध वर्गणीच्या नावाखाली काही गावगुंड हजारोची रुपयांची वर्गणी वसूल करीत असून वर्गणी न देणाऱ्या व्यवसायिकांना धमकावणे व मारहाण करणे या प्रकारामुळे व्यापारी वर्ग दहशतीखाली आहे. त्यातच गणेशोत्सव तोंडावर आल्या