धुळे शहरातील वरखेडी पुलाखालील बोगद्यात भरधाव ट्रालाचा भीषण अपघात झाला. छत्तीसगडहून सुरतला निघालेला चालक यशवंत राज सायर काठात (३५, रा. अजमेर) रस्ता चुकल्याने वळण घेताना ट्राला भिंतीवर आदळला. धडकेमुळे ॲल्युमिनियम तारांचे अवजड बंडल केबिनवर कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. आझाद नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढला असून, पुढील तपास सुरू आहे.