बीड शहरात सुरू असलेल्या गणेश उत्सवाच्या उत्साहात काही ठिकाणी नियमांची पायमल्ली झाल्याचे समोर आले आहे. उत्सव काळात डीजे वाजवण्यास प्रशासनाने स्पष्ट बंदी घातली असताना, काही मंडळांनी डीजेचा वापर करून मोठ्या आवाजात गाणी लावली. यामुळे परिसरात ध्वनीप्रदूषणासह नागरिकांच्या तक्रारी वाढल्या. याबाबत तातडीने कारवाई करत शिवाजीनगर पोलिसांनी चार डीजे ताब्यात घेतले. संबंधित डीजेवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी सर्व गणेश मंडळांना पुन्हा एकदा आवाहन केल.