तुळजापूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान तालुक्यातील विविध गावांच्या मतदार यादीत बोगस मतदारांची नावे जाणूनबुजून समाविष्ट करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. साधारण सहा हजारांपेक्षा जास्त नावे मतदार यादीत समाविष्ट झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. या संदर्भात खा.ओमराजे निंबाळकर यांनी थेट केंद्रीय निवडणूक आयुक्ताकडे या अनुषंगाने पत्राद्वारे कळविले होते.