अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्याच्या विरोधात महिला चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अकोल्यातील गुडधी परिसरात आज महिलांनी थेट अवैध दारू विक्रेत्यांच्या घरावर मोर्चा काढला आहे. दरम्यान या महिलांनी आक्रमक होत. दारू विक्रेत्यांच्या दुकानांची तोडफोड केली. यावेळी मोठी खळबळ उडाली होती. अवैध दारू विक्रेत्यांच्या घरावर अचानक काढण्यात आलेल्या या मोर्चामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होताय. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत वाद निवळला.