क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. सेनगांव तालुक्यात मागील आठवड्यात ढगफुटी सदृश्य पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. तसेच हुमणी अळीने देखील शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने तात्काळ शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोरेगांव या ठिकाणी आमदार मुटकुळे यांना निवेदन सादर केले.