शिक्षक बदली संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांना निवेदन देण्यात आले. जळगाव पंचायत समिती अंतर्गत शिक्षकांच्या बदल्यांची संख्या ही जास्त असून तालुक्यात येणाऱ्या शिक्षकांची संख्या ही कमी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे जोपर्यंत तालुक्यात शिक्षक प्रमाणात येत नाही तोपर्यंत बदल्या झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करू नका अशी मागणी करण्यात आली आहे.