भंडारा जिल्ह्यातील कान्हाळगाव येथील ऊष्टीदास धीनाजी कावळे वय 54 वर्षे हे आपल्या मोटरसायकलने पवनी येथे जात असताना समोरील मोटरसायकलने धडक दिल्याने उष्टीदास कावळे हे जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय पवनी येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर भंडारा शहरातील एका खाजगी रुग्णालयात अति दक्षता विभागात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी डॉक्टरी मेमो वरून पोलीस स्टेशन भंडारा येथे मर्ग दाखल करण्यात आला आहे.