हैदराबाद विभागातील भिकनूर - तळमडला - अक्कनकोट सेक्शन मध्ये काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. मार्ग बदलण्यात आलेल्या गाड्या: काचेगुडा - नरखेड, लिंगममपली - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हैदराबाद - हिसार, हजुर साहेब नांदेड - तिरूपती स्पेशल. तर अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या; संबलपुर - हजुर साहेब नांदेड, हुजुर साहेब नांदेड - संबलपुर, काचेगुडा - पुर्णा.