काल रात्री पासून सुरु असलेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्हात "जिकडे तिकडे चोहीकडे, सगळीकडे पाऊसच गडे" अशी अवस्था झाली आहे, जिल्ह्यात पावसामुळे चांगलाच धुमाकूळ घातला असून शेती गाव तालुके हे जलमय झाल्याचे पाहायला मिळत आहे, जिल्ह्यातील विविध गावांचा रोडवरून पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून संपर्क तुटला असून प्रशासन देखील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करत आहेत. जिल्हातील शेती देखील पाण्यामुळे क्षतीग्रस्त झाल्याचे दिसत आहे.