पोलीस स्टेशन शिरखेड व नेरपिंगळाई येथील सर्व गणेश उत्सव मंडळाच्या वतीने, आज दिनांक ३ सप्टेंबरला सकाळी नऊ वाजता नेरपिंगळाई येथील संत गुलाबपुरी महाराज संस्थान येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण 61 रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले. ठाणेदार सचिन लुले यांचे सह शिरखेड पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी या शिबिरातून रक्तदान केले