कोल्हापुरात आज इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक 2024 च्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. महावीर गार्डन पासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.