चोपडा तालुक्यात श्रीक्षेत्र उनपदेव आहे. येथील वन क्षेत्रांतर्गत येणाऱ्या क्षेत्र क्रमांक १९७ मध्ये खड्डे खोदले होते. तेव्हा तेथे प्रशासकीय कारवाई करण्यासाठी वनरक्षक रुपेश तायडे हे गेले. त्यांना सुभाराम बारेला, प्रेमसिंग बारेला, खेलसिंग बारेला व निर्मला बारेला या चौघांनी मारहाण केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तेव्हा या चार जणाविरुद्ध अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.