आमदार सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचे मालेगावी पडसाद.... गोरक्षक संघटना आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची केली मागणी... Anc : आमदार सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांविषयी केलेल्या वक्तव्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. खोत यांनी गोरक्षकांना 'भक्षक, दलाल आणि डाकू' असे संबोधल्याचा आरोप करत गोरक्षक संघटनांनी आज दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. खोत यांच्या वक्तव्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्या आहेत.