तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस ठाणे हद्दीतील मच्छेरा येथे दि. 25 ऑगस्ट रोज सोमवारला दुपारी 4 वा. च्या सुमारास भंडारा स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी ब्रह्मानंद धनराज शरणागत यांच्या घराची झडती घेतली असता प्लास्टिक पिशव्यात रिमझिम, ईगल, मजा अशा प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू प्लास्टिक पिशव्यात मिळून आले. यावेळी एकूण 36 हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला असून आरोपी विरुद्ध सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.