ओळखीचा फायदा घेऊन अंबड भागातील महाराणा प्रताप चौक येथे 3 लाख 50 हजारांचा सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना घडली असून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मधुकर मनोहर हांडे राहणार महाराणा प्रताप चौक, स्वामी समर्थ केंद्र जवळ, अंबड, सिडको हे सेवानिवृत्त असून त्यांच्या ओळखीचा प्रशांत दुबे राहणार शिवाजी चौक, सिडको याने ओळखीचा फायदा घेऊन फिर्यादी यांच्या घरातील बेडरूम मधील कपाटातून सोन्याच्या दोन अंगठ्या व सोन्याची चैन चोरी करून नेली.