कापुसतळणी आयुष्मान आरोग्य, प्राथमिक केंद्राने श्री गणेशा आयुष्यमान आरोग्य अभियानांतर्गत टाकरखेडा मोरे येथील संत गुलाब बाबा आश्रमात आज ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते.२१५ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला,तरुण उत्साही गणेशोत्सव मंडळाच्या सहकार्याने हे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले असून या शिबिरात डॉ.शांतनु नागपूरकर (प्रभारी वैद्यकीय अधिकारी) आणि पी.एच.सी.कापूसतळणी येथील वैद्यकीय चमू यांनी विविध राष्ट्रीय कार्यक्रम आणि योजनांची माहिती दिली.