कुडाळ तालुक्यातील घोटगे-ख्रिश्चनवाडी येथे एका महिलेला मध्यरात्री विजेचा शॉक देवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लीना जोसेफ लॉड्रिक्स असे त्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कुडाळ पोलीस ठाण्यातून सोमवार २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता देण्यात आली.