भारतीय जनता पार्टीकडून सुपारी घेऊन लक्ष्मण हाके बीड जिल्ह्यात दाखल झाला असून, त्यांनी जिल्ह्यात राजकीय वातावरण तापवण्याचे काम सुरू केले आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे राज्य प्रवक्ते शिवराज बांगर यांनी केला आहे. बांगर म्हणाले, "लक्ष्मण हाके यांचा लढा नेमका ओबीसी समाजासाठी आहे का? की फक्त धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांना वाचवण्यासाठी आहे? हा प्रश्न ओबीसी समाजाने विचारला पाहिजे." ओबीसी समाजाचा खरा लढा लढण्यासाठी सक्षम नेते समाजामध्येच आहेत.