आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ 2 पोलीस ठाणे हद्दीत रूट मार्च काढण्यात आला.आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान नाशिकरोड पोलीस ठाणे येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सुभाष रोड, सत्कार पॉईंट, देवळाली गाव, जय भवानी रोड ते बिटको पॉईंट भागातून हा रूट मार्च काढण्यात आला.नाशिकरोड पोलीस स्टेशन व उपनगर पोलीस ठाणे हद्दीत संवेदनशील भागामध्ये रूट मार्च घेण्यात आला.याबाबत पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी अधिक माहिती दिली आहे.