तुळापुर गावाच्या हद्दीत खंडोबा मंदिराजवळील शिवले वस्ती येथे इंद्रायणी नदीकिनारी गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या दारू भट्टीवर कारवाई केली आहे. या कारवाईत दरम्यान पाच लाख रुपये किमतीचे गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन व इतर साहित्य नष्ट करण्यात आले आहे. दारूची वाहतूक करणारा टेम्पो जप्त केला आहे. याप्रकरणी सचिन राखपसरे, प्रदीपकुमार निषाद यांच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.