लातूर-वरवंटी,बसवंतपूररातगेल्या अनेक वर्षांपासून वारंवार तहसील कार्यालयात निवेदन देऊनही समाधानकारक तोडगा न निघाल्याने वरवंटी व बसवंतपूर ग्रामस्थांना वारंवार निराशेचा सामना करावा लागत होता. स्मशानभूमीत पावसाळ्याच्या दिवसांत अंत्यविधी करताना मोठी अडचण निर्माण होत असल्याने ग्रामस्थांनी लोकसहभागातून वर्गणी जमा करून लोखंडी पत्र्याचे शेड उभारले. यामुळे आता गावात एखादी व्यक्ती मयत झाल्यास पावसाळ्यातही अंत्यविधी अडथळ्याविना पार पाडणे शक्य झाले आहे. मात्र यावर बिल्डर नावंदर यांनी आक्षेप घेतला.