महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांची दुःख नष्ट होऊ दे तसेच त्यांना आनंद आणि समृद्धी मिळो अशीच माझी विघ्नहर्त्याकडे प्रार्थना असल्याची प्रतिक्रिया आज आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. आणि पुढचे दहा दिवस महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव आपण अत्यंत उत्साहात आणि शांततेत साजरा करूयात असं देखील ते यावेळी म्हणाले आहेत.