दोन आणि त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेले ४८ आरोपी हे यंदा श्रींच्या मिरवणुकीत व ईद ए मिलाद यांच्या मिरवणुकीत दिसणार नाहीत. कारण त्यांना पोलिसांनी या कालावधीत शहरातून बाहेर जाण्याचे आदेश काढले आहेत. याची माहिती पोलिसांनी बुधवारी पत्रकाद्वारे दिली.या आदेशाची कडक अंमलबजावणी केली जाईल. जर कोणी याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होईल.