कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराने नियमांचा भंग करत गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान इचलकरंजीत हिंसाचार केला.गाडी न दिल्याच्या कारणावरून निखिल नितीन घाडगे (वय २५, रा.साईनाथनगर, भोनेमाळ) या तरुणावर लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला करण्यात आला.या हल्ल्यात घाडगे गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही धक्कादायक घटना रविवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी नऊच्या सुमारास कामगार चाळ परिसरात घडली.