तुमसर तालुक्यातील मोहाडी खापा व चुल्हाड येथे आज दि. 23 ऑगस्ट शनिवारला सायं.5 वा. तान्हा पोळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी लहान बालकांनी लाकडी नंदी बैलांना आकर्षक सजवून तान्हा पोळ्यात सहभागी झाले.यावेळी मान्यवरांनी लाकडी नंदीचे पूजन करून तान्हा पोळ्यात सहभागी झालेल्या बालकांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू प्रदान करण्यात आले. याप्रसंगी मोहाडी खापा व चुल्हाड येथील पदाधिकारी व महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.