वाघोली येथील नागरीक तथा समाजसेवक सुभाष जाधव यांच्या घराच्या शेजारी भरपूर प्रमाणात कचरा पडलेला होता. त्या कचऱ्याचा पूर्णपणे दुर्गंध आसपासच्या परिसरात पसरला होता. दहा दिवसापुर्वा आयुक्त व घनकचरा व व्यवस्थापन सर्व अधिकारी यांना संपर्क करुन त्यांना फोटो, व्हिडिओ करुन तक्रार केली होती पण दहा दिवस झाले त्या ठिकाणाहून कचरा उचललेला नाही त्यामुळे जाधव यांनी त्यांच्यासाठी भेट वस्तूच्या स्वरूपात कचरा घेऊन पोत्यात नेला, भेटवस्तूचा कागद वापरुन वडगावशेरी महापालिका कार्यालयात अधिका-यांना दिले