आष्टी पोलीस ठाण्याच्या पथकाने एका धाडसी कारवाईत कत्तलीसाठी बेकायदेशीररित्या कोंडून ठेवलेल्या तब्बल 35 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. या कारवाईमुळे गाव परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस पथकाच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे, शेकापूर रोडलगत एका पत्र्यांनी आच्छादलेल्या घरामध्ये गोवंश जातीची जनावरे चारापाणी न देता अमानुष पद्धतीने कोंडून ठेवण्यात आली होती. या जनावरांची कत्तल करण्याचा उद्देश असल्याची खात्री पोलीस तपासात झाली आहे.