पाचोरा तालुक्यातून शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. पिंपळगाव परिसरात स्कुल व्हॅन चालकाने एका विद्यार्थिनींचा विनयभंग केला. या प्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली असून आरोपीस न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी तीन वाजता हाती आली आहे, मंगळवारी (१९ ऑगस्ट) रोजी फिर्यादींची अल्पवयीन मुलगी ही उतावळी नदीच्या पुलाचे बाजुला महीलांचे सार्वजनिक शौचालयास गेली होती.