२० सप्टेंबर २०२३ रोजी राजुरा तालुक्यातील जोगापुर वनपरीसरात जंगली श्वापदाच्या हल्ल्यात गडचांदूर येथील कै. राजेश रतिलाल राठोड यांचा दुर्देवी मृत झाला होता; त्यासंदर्भात आज दि ३१ जुलै ११ वाजता आ देवराव भोंगळे यांच्या राजुरा येथील निवासस्थानी वनविभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पंचवीस लक्ष रुपयांच्या धनादेशाचे आ.भोंगळे यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबीयांना वरीष्ठ वनाधिकाऱ्यांसह वितरण केले.