जळगाव एमआयडीसीतील सी-सेक्टर मधील डाळ व्यापाऱ्याची तब्बल ३६ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील 'सक्षम उद्योग'चे मालक विनोदकुमार चंचलचंद जैन यांची, दलाल आणि तीन व्यापाऱ्यांनी संगनमताने मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणी बुधवारी १० सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.