29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मुंबईत धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे, पण या इशाऱ्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे. दरम्यान हाके यांनी जरांगे पाटलांवर थेट आरोप करताना ते समाजात दहशत निर्माण करत असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर जरांगे पाटलांना संविधान मान्य नसल्याचाही आरोप त्यांनी केला.